सोमवारी कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:19+5:302020-12-27T04:22:19+5:30
रामनगर : दत्त जयंतीनिमित्त रामनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सोमवारी रात्री ८ वाजता हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे ...

सोमवारी कीर्तन
रामनगर : दत्त जयंतीनिमित्त रामनगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सोमवारी रात्री ८ वाजता हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
कृषी विज्ञान केंद्रात महिलांचा सत्कार
जालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या वतीने किसान दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हडप सावरगाव येथील सिंधू डोंगरे, सिंधी काळेगाव येथील नंदा गिराम, दैठणा येथील अंजना धांडे व आश्विनी मातणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माचे संचालक बाळासाहेब शिंदे, एस.व्ही. सोनुने, बी.वाय. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
स्तंभावर सर्व स्वातंत्र्य सैनिकांची नावे टाका
जालना : शहरातील मंमादेवी चौकातील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या स्तंभावर सर्व स्वातंत्र्य सैनिकांची नावे टाकावीत, अशी मागणी जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दानकुंवर शाळेत कार्यक्रम
जालना : शहरातील दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयात गणित दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा पवार, गायत्री शुक्ला, चंद्रकांत दायमा, किरण शर्मा, प्रणिता वडगावकर, बिराजदार, सतीश संचेती, रूपेश परिहार, राजेंद्र देशपांडे आदींची उपस्थिती होती.
स्वच्छता मोहिमेची मागणी
जालना : शहरातील लक्कडकोटसह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या भागातील नाल्या तुंबल्या असून, ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.