अंबडमध्ये मोहसीन खान याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:49+5:302021-02-16T04:31:49+5:30

वालसावंगी परिसरात बेसमुमार वृक्षतोड वालसावंगी : वालसावंगी व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे वृक्षांची संख्या ...

Mohsin Khan felicitated at Ambad | अंबडमध्ये मोहसीन खान याचा सत्कार

अंबडमध्ये मोहसीन खान याचा सत्कार

वालसावंगी परिसरात बेसमुमार वृक्षतोड

वालसावंगी : वालसावंगी व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे वृक्षांची संख्या घटल्याने पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. शासन विविध उपक्रम राबवून वृक्षलागवड, संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे वालसावंगी व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. ही वृक्षतोड संबंधित अधिकाऱ्यांनी थांबवावी, अशी मागणी होत आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा नागरिक जखमी

जालना : तालुक्यातील नेर येथे गत काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील जवळपास १५ जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. नेर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधितांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Mohsin Khan felicitated at Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.