राजूर येथे महसूल विभागाकडून फेरफार अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST2021-09-11T04:30:00+5:302021-09-11T04:30:00+5:30

राजूरसह परिसरात महसूल विभागाकडे अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या ...

Modification Court by Revenue Department at Rajur | राजूर येथे महसूल विभागाकडून फेरफार अदालत

राजूर येथे महसूल विभागाकडून फेरफार अदालत

राजूरसह परिसरात महसूल विभागाकडे अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी, तसेच कामाचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी राजूर मंडळातील शेतकऱ्यांसाठी बुधवारी मंडळाधिकारी व्ही. ए. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या फेरफार प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी तलाठी अण्णासाहेब कड, एस. जी. इंगळे, आर. आर. गायके, जी. एन. तांगडे, एम. एन. जैन, के. पी. काळमेघे, दिलीप पुंगळे, विनोद थोटे, सोमीनाथ नागवे, दत्तू नागवे, निलेश तवले, प्रभू मोरे, गणेश पुंगळे, प्रल्हाद रावळकर आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळी

राजूर येथे महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी व्ही. ए. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली फेरफार अदालत घेण्यात आली.

Web Title: Modification Court by Revenue Department at Rajur