शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:27 IST

एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आगामी निवडणुकीत मतदारांनी थापा मारणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला हिसका दाखवण्याची गरज असून, दुष्काळातही हे सरकार दुजाभाव करत असल्याने शेतकयांची होरपळ सुरू आहे. त्यामुळे एकूणच  जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ते घनसावंगी येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ रूपये लिटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे देश सोडून जातात कसे, असा सवाल त्यांनी केला. सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात, असा प्रश्नही मुंडेंनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील, असेही ते म्हणाले.खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना त्यांनी शेतक-यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. दरम्यान शिवसेनेची आता शेळी झाल्याचेही मुंडे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण देशात चौकीदार चोर है च्या मुद्यावरून रान पेटल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महागाईच्या मुद्यावरून आकांडतांडव करणारा भाजप आता गप्प असल्याने लोकांचे त्यांच्या या बदलत्या विचाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले. मुंडेच्या चौफेर टोलेबाजीचे सभेस उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण