मेटारोल इस्पातचे स्टील फ्रान्सला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:00+5:302021-01-15T04:26:00+5:30
या पूर्वीही या कंपनीने हे थ्रेडेड बार इटलीला निर्यात केले होते. आता फ्रान्ससारख्या प्रगत देशात जालन्यातील मेटारोल इस्पातच्या स्टीलला ...

मेटारोल इस्पातचे स्टील फ्रान्सला रवाना
या पूर्वीही या कंपनीने हे थ्रेडेड बार इटलीला निर्यात केले होते. आता फ्रान्ससारख्या प्रगत देशात जालन्यातील मेटारोल इस्पातच्या स्टीलला मागणी येणे एक गौरवशाली बाब म्हणावी लागेल.
हे स्टील फ्रान्समधील वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रासाठी वापरण्यात येणार आहे. त्यात उड्डाणपुलासाठी लागणारे बोगदे, गगनचुंबी इमारती, महाकाय पूल, धरणे, मिनिंग ट्यूनेलिंग, सॉईल नेलिंग, मायक्रो पील्स, पोस्ट टेन्शनिंग, रेटेनिंग वॉल्स, ड्रील शाप्ट, रेन फोर्सिंग स्टील, आदी कन्स्ट्रक्शनसाठी मेटारोल इस्पातचे स्टील वापरले जाणार आहे. या फ्रान्समधील स्टीलची एक कंटनेर त्यांच्या मागणीनुसार रवाना करण्यात आले. यावेळी मेटारोल इस्पातचे संचालक डी. बी. सोनी, आशिष भाला, विवेक मोहता, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, हे तंत्रज्ञान मेटारोलमध्ये आणून त्यापासून दर्जेदार स्टील निर्माण करण्यासाठी कंपनीच्या सर्व तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांचेही मोठे योगदान असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डी. बी. सोनी यांनी सांगितले.