बाथ्री तेली महिला मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:57+5:302021-02-05T07:59:57+5:30

बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याबरेाबरच दहावी बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक, तसेच महिला ...

Meritorious students felicitated by Bathri Teli Mahila Mandal | बाथ्री तेली महिला मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बाथ्री तेली महिला मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याबरेाबरच दहावी बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक, तसेच महिला मंडळासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. या वर्षीही २४ जानेवारी रोजी बाथ्री तेली समाज भवन येथे कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हापुरवठा अधिकारी रिणा बसैये यांची उपस्थिती होती, तर बाथ्री तेली एकता महिला मंंडळाच्या अध्यक्षा कविता लिधोरीये, उपाध्यक्षा आशा रोडीया यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर प्रमुख पाहुण्या रिना बसैये यांचा सत्कारही करण्यात आला. स्वागत गीत प्रेमलता लिधोरीया यांनी सादर केले. याबरोबर श्रद्धा लिधोरीये, पीयूष रोडीया याने गिटार वाजवून कलेचे प्रदर्शन केले. यावेळी दहावी बारावीत गुणवंत ठरलेले अतुल चौंडीये, कृष्णा जेठे, यश चौंडीये, तेजस चौंडीये, राहुल कुरलीये, यश रठय्ये, निकीता जेठे, सीमा मंडोरे, वैष्णवी लिथोरीये, श्रद्धा कुरलीये, वैष्णवी कुरलीये, अक्षय बसैये, अदित्य कुरीलये, जयेश नरवय्ये, मोहित चौंडीये यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय तैलीक महासंघाचे अध्यक्ष किशनलाल जेठे यांच्या वतीने दोन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती चौंडीये, उमा लाचुरीये, सारिका सातपुरीये, ललिता चौंडीये, कल्पना चौंडीये, ज्योती बंसीले, शीतल चौंडीये आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक रोडीया यांनी केले.

Web Title: Meritorious students felicitated by Bathri Teli Mahila Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.