वालसावंगीत शाळा सुरू करण्याबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST2021-07-16T04:21:33+5:302021-07-16T04:21:33+5:30
निमखेडा येथे वृक्षारोपण जालना : तालुक्यातील निमखेडा बुद्रुक येथे ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ...

वालसावंगीत शाळा सुरू करण्याबाबत बैठक
निमखेडा येथे वृक्षारोपण
जालना : तालुक्यातील निमखेडा बुद्रुक येथे ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विवेक पाटील, तलाठी अविनाश देवकर, गणेश सपकाळ, कृष्णा फुलमाळी, वनपाल सोनू जाधव, प्रतिभा काळे, समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.
वालसावंगी येथे रोहित्राने घेतला पेट
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जुन्या बसस्थानक भागातील रोहित्राने मंगळवारी अचानक पेट घेतला. रोहित्रावर भार पडल्याने पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. रोहित्राने पेट घेतल्यानंतर काही वेळात विद्युत प्रवाह बंद करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. येथील विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महावितरणने याबाबत लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नेत्रतपासणी शिबिराला प्रतिसाद
घनसावंगी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कल्पनेतून नवदृष्टी महाअभियान कार्यक्रमाअंतर्गत घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सोमवारी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १७२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५८ जणांवर पुणे येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी रवींद्र आर्दड, गणेश तौर, अशोक गुजर, गजानन भोसले, गौपाल तौर हे हजर होते.
कुंभार पिंपळगावात पावसात भरला बाजार
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगावात पावसाने बुधवारी सकाळपासूनच हजेरी लावली. त्यामुळे येथील बुधवारचा बाजारही पावसात भरला होता. सकाळपासून व्यापाऱ्यांनी पावसात भाजीपाल्याची दुकाने लावली होती. तर काही व्यापारी आडोशाला थांबले होते. काही व्यापाऱ्यांनी छत्र्या, घोंगडे, प्लास्टिक आच्छादनाचा आधार घेत साहित्याची विक्री केली. दुपारनंतर साहित्याची विक्री केली.
दुधनेचे पाणी शिरले गावात
बदनापूर : तालुक्यातील अकोला निकळक शिवारात समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामाचे दगड व इतर साहित्य दुधना नदीच्या पात्रात अडकले. त्यामुळे नदीचा प्रवाह मंदावला आहे. त्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नदीचे पाणी परिसरातील घरात शिरले. काही घरात पाण्यातील साप, बेडूक शिरले होते. त्यामुळे अनेकांनी घरात न थांबता मंदिरात रात्र काढली.
रोजगार मेळाव्याचे आयोजन
जालना : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत १५ जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ ते ३० जुलै दरम्यान ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जांबसमर्थ परिसरात जोरदार पाऊस
जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडळात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात हातडी परिसरात पावसामुळे शेतातील बांध फुटून गेले. शेतजमीन खरडून गेली. हातडी-काकडे कंडारी जोड रस्त्यावरील कसुरा नदीला पूर आल्याने पुलाची एकीकडील भिंत व भराव वाहून गेला. त्यामुळे वाहनचालकांची बुधवारी गैरसोय झाली.