सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:36+5:302021-02-10T04:30:36+5:30

पिंपळगाव रेणुकाई येथे अभिवादन कार्यक्रम भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

Meeting of office bearers of Saneguruji Kathamala | सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची बैठक

सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपळगाव रेणुकाई येथे अभिवादन कार्यक्रम

भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी रमाई यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचफुला बोर्डे, संजय बोर्डे, शैलेश बोर्डे, सुभाष बोर्डे, तातेराव बोर्डे, संतोष बोर्डे, अमोल बोर्डे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याची मागणी

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्ता अपघातात वाढ झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद शाळेत माता रमाईंना अभिवादन

जालना : तालुक्यातील पिंपरी फाटा जिल्हा परिषद शाळेत माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मांटे, कोंडाबाई जाधव, मुख्याध्यापक किंगरे, निपाणीकर, मंडपे, चौधरी, विजय जाधव, कैलास जाधव, शरद जाधव, विशाल जाधव, आर्यन जाधव, धीरज जाधव आदींची उपस्थिती होती.

विस्कळीत वीजपुरवठा; ग्राहकांची गैरसोय

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघु व्यवसाय ठप्प होत असून, शेतातील कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तांत्रिक समस्या सोडवाव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

धनगर समाजाचे साखळी उपोषण

परतूर : तालुक्यातील लोणी शिवारात शेगाव - पंढरपूर मार्गावरील शेतवस्तीवर धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनाला वंचितचे उपाध्यक्ष रोहन वाघमारे यांनी भेट दिली. यावेळी तात्याराव बहिरे, महादेव बहिरे व इतरांची उपस्थिती होती.

Web Title: Meeting of office bearers of Saneguruji Kathamala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.