भारतीय वीर किसान पार्टीचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST2021-02-18T04:55:53+5:302021-02-18T04:55:53+5:30
‘व्हीएसएस’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जालना : शहरातील व्हीएसएस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ...

भारतीय वीर किसान पार्टीचा मेळावा
‘व्हीएसएस’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जालना : शहरातील व्हीएसएस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. जयेश मिनासे, प्रा. सोनाली राठोड, प्रा. मानसी दायमा, प्रा. नम्रता देशमुख, प्रा. कांचन मुळे, प्रा. प्रतीक्षा वाहूळ, प्रा. सोनल तिवारी, प्रा. अशोक सवडे, प्रा. जया तोंडूळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
शिवसंग्रामचे बाळासाहेब काळवणे यांचा सत्कार
जालना : शिवसंग्रामचे अंबड तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे यांची किनगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते काळवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, निलेश गोर्डे, लक्ष्मण नवले, प्रशांत गोळे, सचिन मिसाळ, सचिन खरात, मनोज वटाणे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
कुंभार पिंपळगावातील अंगणवाडीस साहित्य
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक शाळा व अंगणवाडीत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत सिमती सभापती भागवत रक्ताटे, सभापती बन्सी शेळके, सरपंच अन्वर पठाण, उपसरपंच मनोज गाडे, जि.प. सदस्य अंशीराम कंटुले, पं.स. सदस्य अशोक उदावंत, अजीम पठाण, रफिज कुरेशी, रवींद्र जोशी, माधव हरदास, सुनील खोडदे, बालाजी काकडे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
जानकर यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद
जलना : पक्षबांधणीसाठी सर्व पदाधिकारी, सदस्यांनी एकत्रित काम करावे. गावनिहाय बूथ पोलिंग नेमून जनसंपर्क वाढवावा, असे आवाहन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. रासपच्या वतीने आयोजित मेळाव्यात जानकर यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले. यावेळी रासपचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर, अशोक लांडे, परमेश्वर वाघमोडे आदींची उपस्थिती होती.