मत्स्योदरी विद्यालयाचे व्हॉलीबॉलमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:08+5:302021-02-18T04:56:08+5:30
वाळकेश्वर गावामध्ये स्वच्छता मोहीम शहागड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गावातील विविध भागात ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

मत्स्योदरी विद्यालयाचे व्हॉलीबॉलमध्ये यश
वाळकेश्वर गावामध्ये स्वच्छता मोहीम
शहागड : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गावातील विविध भागात ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी सरपंच बबलू कादरी यांनी ग्रामस्थ, व्यापाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गफार बागवान, सलमन बागवान व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
अवैध वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
अंबड : शहरासह ग्रामीण भागातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असून, भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही बाब पाहता प्रशासनाने वाळू माफियांविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गुरूपिंप्रीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
घनसावंगी : तालुक्यातील गुरू पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच भाऊसाहेब साबळे, उपसरपंच सायली कोल्हे, बाबासाहेब कोल्हे, गजानन कोल्हे, शहाजी कोल्हे, सुनील कोल्हे, अरूण कोल्हे, सावळाराम कोल्हे, लक्ष्मण बनगर, सतीश कोल्हे, जिजा बोरडकर आदींची उपस्थिती होती.
अवैध गारगोटी वाहतूक; चौघावरगुन्हा
जालना : डोणगाव शिवारातील तलावातून अवैध गारगोटी उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. या प्रकरणी बळीराम तळपे यांच्या तक्रारीवरून कृष्णा प्रभाकर सरोदे, साहेबराव नागवे, नायबराव नागवे, गणेश बोडखे आदींविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणीउंचेगाव येथून दुचाकीची चोरी
राणीउंचेगाव : येथील शेख ईस्माईल शेख इब्राहिम अत्तार यांनी ५ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांची दुचाकी (क्र. एम.एच. २१- ए.एम. ८७६८) घरासमोर लावली होती. ती दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.