मास्क अन् सॅनिटायझर देखील संक्रांतीच्या वाणांच्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:07+5:302021-01-13T05:21:07+5:30
दरम्यान, यंदाची संक्रांत ही कोरोनानंतर येत आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीनिमित्त अनेक महिलांनी पारंपरिक वाणांच्या वस्तू देण्यापेक्षा कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ...

मास्क अन् सॅनिटायझर देखील संक्रांतीच्या वाणांच्या यादीत
दरम्यान, यंदाची संक्रांत ही कोरोनानंतर येत आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीनिमित्त अनेक महिलांनी पारंपरिक वाणांच्या वस्तू देण्यापेक्षा कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असणारे मास्क तसेच सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्यांना मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात येथील मास्क विक्रेते सुरेश इंगळे यांनी सांगितले की, शंभर ते २०० मास्कचे पॅक खरेदीला महिलांकडून मोठी मागणी आहे. त्यातही कॉटनपासून तयार मास्कला मागणी असल्याचे ते म्हणाले.
वृक्षाची रोपे देऊन पर्यावरण रक्षण
पर्यावरणाचे रक्षण करण्यात वृक्षांचा मोठा वाटा असतो. ही बाब लक्षात घेऊन येथील मैत्र मांदियाळी या सामाजिक संस्थेकडून ना नफा ना तोटा या तत्त्वावर विविध झाडांची रोपे देखील वाण देण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. पर्यावरणपूरक संक्रांत ही मागणी थीम असल्याचे मैत्र मांदियाळीचे संस्थापक सदस्य अजय किंगरे यांनी सांगितले.