शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 15:28 IST

Father Kills Son for Property : नराधम बापाने जमिनीच्या हव्यासापायी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचा गळा घोटला

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी तिसरा संसार थाटणारा नराधम बाप गजाआड

बीड : तीन विवाह केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी जन्मदात्याने १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील खडकीघाट येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या नराधम पित्याला जेरबंद केले आहे. ( Married for the third time two months ago, ending the first wife's 13-year-old son for the property)

राकेश उमेश वाघमारे (वय १३, रा. खडकीघाट, ता. बीड) असे मृत मुलाचे नाव आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी खडकी घाट येथील वस्तीवरील घरात राकेशचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. राकेशचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यातच त्याचा पिता उमेश पहाटेपासून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुस्तफा शेख यांनी तपासचक्रे गतिमान केली. उमेश बसने पाटोद्याहून पुण्याकडे जात असल्याचे समजल्यावर नेकनूर व पाटोदा पोलिसांनी बसस्थानकात सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पंचनामा करून राकेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीने खुनाची कबुली दिली असून, त्यास आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.

हेही वाचा - मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात

असा रचला कटआरोपी उमेशने तीन विवाह केलेले आहेत. त्याची पहिली पत्नी त्याला साेडून गेली, तर दुसरीने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच त्याने तिसरा विवाह केला होता. तो बीड शहरात वास्तव्यास असे. राकेश हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. तो गावी खडकीघाट येथील वस्तीवर आजी-आजोबांकडे राहत असे. राकेशच्या नावावर काही जमीन आहे. राकेशला संपविल्यानंतर ही जमीन आपल्याला मिळेल, म्हणून उमेशने त्याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी तो मंगळवारीच (दि. १४) खडकीघाट येथे मुक्कामी आला. मध्यरात्रीनंतर त्याने झोपेत राकेशचा गळा आवळून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस