अध्यक्षपदी मरकड, उपाध्यक्षपदी गोरंट्याल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:58 IST2017-04-14T00:56:43+5:302017-04-14T00:58:27+5:30
जालना : ग्रामीण भागाचा अर्थकणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी करण्यात आली.

अध्यक्षपदी मरकड, उपाध्यक्षपदी गोरंट्याल!
जालना : ग्रामीण भागाचा अर्थकणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज मरकड यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्ष माजी आ. कैलास गोरंट्याल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक पदांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, पांडुरंग जऱ्हाड, मनोज मरकड, सतीश टोपे, जिजाबाई जाधव, सत्यभामा कोल्हे, चंद्रमणर खरात, बबन राऊत, संदीप गोरे, राहुल बबनराव लोणीकर (यादव), भाऊसाहेब जाधव, प्रदीप मरकड आदी १५ संचालक बिनविरोध निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा उढाण आणि भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे हे मतदानातून निवडून आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यात अध्यक्षपदी मनोज मरकड, तर उपाध्यक्ष पदी माजी आ. कैलास गोरंट्याल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतषबाजी करुन जल्लोष केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बबलू चौधरी, राजेंद्र राख, विनोद यादव, राजस्वामी, रवी गुल्लापेल्ली, राहूल शिंदे, वैभव उगले, शेख महेमूद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)