शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 1:11 AM

महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील जनता ही खूपच संयमी आणि प्रचंड मेहनत करणारी आहे, त्यातले त्यात मराठवाड्यातील पुरूष मंडळी जास्तीच्या राजकारणाात गुंतल्यामुळे शेतीची जास्तीत - जास्त कामे या महिला करत आहे . या महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ते सोमवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमात बोलत होते.मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ कृषीभूषण बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ.विनायक मेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेश टोपे, डॉ.संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, अंकुश राउत, शेख महेमूद, सिध्दीविनायक मुळे, बी एम दानवे, गणेश सुपारकर, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.विनायक मेटे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आ.राजेश टोपे, डॉ. संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, यांनी सविस्तर मते मांडून मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष करण्यासह योजना कशा आणता येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जगन्नाथ काकडे यांनी केले. अशोक पडूळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद देशमूख यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वाढेकर, नरसिंग पवार ,रमेश गजर, दिलीप तळेकर, दत्ता शिंदे, कृष्णा पडूळ, गणेश पडूळ, कचरे, आकात थेंगडे, शुभम टेकाळे, सचिन कचरे, भुतेकर, कृष्णा क्षीरसागर, दिलीप भिसे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :WomenमहिलाMarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा