हिंदी विद्यालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:47+5:302021-02-05T08:04:47+5:30
बदनापुरात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे चर्चासत्र जालना : जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या उपक्रमांतर्गत बदनापूर येथे चर्चसत्र घेण्यात आले. यावेळी ...

हिंदी विद्यालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम
बदनापुरात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे चर्चासत्र
जालना : जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या उपक्रमांतर्गत बदनापूर येथे चर्चसत्र घेण्यात आले. यावेळी प्रवक्ता नौशाद उस्मान यांनी प्रास्ताविकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदची स्थापना, कार्य याबाबत माहिती दिली. अ.रशिद यांच्या कुरान पठण व भाषांतराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काझी गालीब, मिर्झा अफसर बेग, शेख इस्माईल, रियाज टेलर, शेख इब्राहीम आदींची उपस्थिती होती.
हसनाबादेत नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा हजरत टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सलीम काझी हसनाबादकर, अध्यक्ष मोबीन सय्यद, उपाध्यक्ष मोहसीन पठाण, सचिव रफीक शेख, अबुझर काझी, सलमान पठाण, शोहिब पठाण, अरबाज अत्तार, शाकीर सय्यद व इतरांची उपस्थिती होती.