शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:02 IST

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भरपावसाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गत काही वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गतवर्षीही जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके करपून गेली होती. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत होते. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असल्याने टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत होती. यावर्षी टँकरने ६०० चा पल्ला गाठला होता. यावरुनच गतवर्षीच्या पाणीटंचाईची भीषणता दिसून येते.त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकºयांना होती. पावसाळ््याच्या सुरुवातीलच पावसाने हजेरीही लावली. शेतकºयांनी याच पावसाच्या भरोशावर लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले होते. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागात याच काळात दमदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, नदी, नाल्या, तलावांमध्ये पाणीच आले नाही. विहिरी बोअर कोरडेठाक असल्यामुळे भरपावसाळ््यात टँकरची संख्या ४०० जवळपास होती. परंतु, काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. परिणामी, टँकरची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या बदनापूर तालुक्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर परतूर तालुक्यातील एका गावाला एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.संताप : ३९ विहिरींचे अधिग्रहण; वाढीव उपाययोजनांची गरजबदनापूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधून टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ