कोरोनाच्या भीतीमुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अद्याप शाळेच्या बाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:15+5:302021-01-08T05:39:15+5:30
जालना : कोरोनातील सूचनांचे पालन करीत जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. शाळेत येणाऱ्या मुलांपैकी ...

कोरोनाच्या भीतीमुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अद्याप शाळेच्या बाहेरच
जालना : कोरोनातील सूचनांचे पालन करीत जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. शाळेत येणाऱ्या मुलांपैकी एकालाही कोरोनाचे संक्रमण झाले नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, कोरोनाची भीती मनात कायम असल्याने जवळपास ५० हजारावर मुले अद्यापही शाळेत येत नाहीत.
कोरोनात बंद पडलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. कोरोनातील सूचनांचे पालन करून नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. जिल्ह्यातील नववी ते बारावी वर्ग असलेल्या ५२६ शाळांपैकी ५१९ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातील १ लाख २७ हजार ७२७ मुलांपैकी केवळ ६९ हजार ७३२ मुले शाळेत हजेरी लावत आहेत. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या कमी- अधिक होत आहे. शाळेत येणाऱ्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह इतर सूचनांचे पालन केले जात आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ५० हजारावर मुले शाळेत येत नाहीत.
दक्षतेमुळे विद्यार्थी कोरोनापासून दूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. शिवाय सॅनिटायझर, मास्कचा वापर यावरही अधिकाधिक भर देण्यात आला आहे. कोरोनातील सूचनांचे पालन करून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत येणाऱ्या मुलांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरून मिळालेल्या सर्व सूचनांचे पालन करून आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. सुरू असलेल्या सर्व शाळांमध्ये कोरोनातील सूचनांचे, नियमांचे पालन व्हावे, यासाठी वेळोवेळी सूचनाही दिल्या जात आहेत. कोरोनावर मात करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- नागेश मापारी, उप शिक्षणाधिकारी
५२६
जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा
५१९
सुरु असलेल्या शाळा
१२१७२७
एकूण विद्यार्थी
६९७३२
विद्यार्थ्यांची उपस्थिती