घरावरून जणाऱ्या उच्च विद्युत वाहिन्यांमुळे अनेकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:21+5:302021-08-29T04:29:21+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथील दलित वस्ती वॉर्ड क्रमांक पाच येथील घरावरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या ...

Many lives are in danger because of high power lines running through the house | घरावरून जणाऱ्या उच्च विद्युत वाहिन्यांमुळे अनेकांचा जीव धोक्यात

घरावरून जणाऱ्या उच्च विद्युत वाहिन्यांमुळे अनेकांचा जीव धोक्यात

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथील दलित वस्ती वॉर्ड क्रमांक पाच येथील घरावरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरणाऱ्या असून, त्या काढून इतर ठिकाणाहून न्याव्यात, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते २०१६ पासून पाठपुरावा करीत आहेत. परंतु, अद्यापही या तारा आहे त्याच धोकादायक अवस्थेत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयास वेळोवेळी निवेदन देण्यात आले. तसेच महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देत तारा हटविण्यात येतील, असे सांगितले. मात्र हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे तत्काळ उच्च दाबाची विद्युत वाहिनी व रस्त्यावरील डीपी काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अंबादास बुरकुल, गणेश शिंगणे, वसंता पाटील, शेख जुल्फेकार, मधुकर शिंगणे, राहुल कदम, रामेश्वर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो निवेदनाचा

Web Title: Many lives are in danger because of high power lines running through the house