शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 07:23 IST

शेकडो वाहनांचा ताफा, हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह जरांगे-पाटील यांचे प्रस्थान; २६ पासून उपोषण

अंतरवाली सराटी/जालना/वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे वादळ शनिवारी ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आरक्षणाच्या अंतिम लढ्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शेकडो वाहनांचा ताफा आणि आपल्या हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह मुंबईकडे पायी मोर्चाद्वारे कूच केले. २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी चार महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेला मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू झाला. ‘लढेंगे और जितेंगे!’ या निर्धारासह त्यांनी मुंबईकडे प्रस्थान ठेवले. सकाळीच गावात असंख्य मराठा युवक, युवतींसह महिलांची गर्दी झाली होती. सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास मनाेज जरांगे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गावातील महिलांनी औक्षण करून निरोप दिला. त्यावेळी महिलांसह वयोवृद्धांनाही गहिवरून आले होते. त्यानंतर घोषणा देत पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. मार्गात अनेक ठिकाणी जरांगे-पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

पाच जिल्ह्यांतून जाणार यात्राहा  मोर्चा जालना, बीड, अहमदनगर, पुणे, ठाणे या पाच जिल्ह्यांतून जाणार असून, २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. ठिकठिकाणी दुपारी, रात्री जेवण आणि राहण्याची व्यवस्था समाजबांधवांकडून केली आहे.

कोणी उद्रेक केला, तर पोलिसांच्या ताब्यात द्याआपले आंदोलन शांततेत सुरू आहे आणि सुरू राहणार. रॅलीत कोणी उद्रेक, जाळपोळ केली, तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या. वाद घालू नका, एकमेकांची काळजी घेऊन रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले.

महामार्गांवर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामसोलापूर-धुळे, तसेच कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने, नागरिकांचा जनसमुदाय यामुळे वाहतूक संथ होती. ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो, चारचाकी वाहने व दुचाकी या शेकडो वाहनांमुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

ठिकठिकाणी स्वागतगेवराईतील शिवाजी महाराज चौकात ५१ जेसीबीने दोन टन झेंडूची पुष्पवृष्टी, क्रेनद्वारे मोठा हार घालून जरांगे पाटील व सहभागींचे स्वागत करण्यात आले. गढी येथील माजलगाव चौकात परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी स्वागत केले. 

ही टोकाची लढाई, आता माघार नाहीमराठा आरक्षणासाठी ३०० हून अधिक युवकांनी आत्महत्या केली. ४५ वर्षांपासून लढा सुरू आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या तरी सरकार प्रमाणपत्र देत नाही. ज्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं, ज्यांचा एकुलता एक मुलगा हातचा गेला, त्यांच्या वेदना पाहून डोळ्यांत अश्रू येतात. मी असेन, नसेन. आंदोलन थांबू देऊ नका. आता ही टोकाची लढाई आहे. शासनासमवेत बोलणी सुरूच राहतील; मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. - मनोज जरांगे-पाटील, आंदोलनकर्ते

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmarathaमराठा