नियमांचा बागुलबुवा करून पालिकेकडून व्यापारी वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:47+5:302021-05-27T04:31:47+5:30
गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठ बंद आहेत. ही बाब मान्य आहे, परंतु ज्यांच्या घरात जाण्यासाठीचा रस्ताच दुकानातून जात असल्याने ...

नियमांचा बागुलबुवा करून पालिकेकडून व्यापारी वेठीस
गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठ बंद आहेत. ही बाब मान्य आहे, परंतु ज्यांच्या घरात जाण्यासाठीचा रस्ताच दुकानातून जात असल्याने त्यांना एक शटर हे उघडावेच लागते. त्यामुळे तर उघडे असेल तर लगेच दंड कसा, असा सवाल बोरा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
चौकट
समन्वय महत्त्वाचा भाग
कोरोना हा गंभीर आजार आहे, हे मान्य आहे. गर्दीतून तो अधिक स्प्रेड होऊ शकतो. त्यासाठी जे निकष घालून दिले आहेत. ते व्यापारी पाळत आहेत. सुरक्षित अंतर, मास्क नसल्यास साहित्य न देणे, तसेच प्रत्येक दुकानात सॅनिटायझर ठेवले आहे. त्यामुळे एवढे करूनही केवळ जिल्हा प्रशासनास आपण काही केले आहे, असे दर्शविण्यासाठी ही दंड वसुली सुरू असल्याची खंत आहे.
ॲड. विजया बोरा, जालना