आंबा बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:22+5:302021-01-18T04:28:22+5:30
नामविस्तारदिन साजरा जालना : शहरातील नागसेन ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष ...

आंबा बहरला
नामविस्तारदिन साजरा
जालना : शहरातील नागसेन ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष राजेश राऊत, अरूण सरदार, महेंद्र रत्नपारखे, उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
अपघाताचा धोका
अंबड : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, अनेक वाहन चालक दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला चिटकून वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
मोबाईलधारक त्रस्त
बदनापूर : शहरासह परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.
चालकांची कसरत
घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.