भोकरदन पालिकेत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST2021-01-02T04:26:17+5:302021-01-02T04:26:17+5:30

लोकमत न्युज नेटवर्क भोकरदन : भोकरदन नगरपालिकेत शुक्रवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडप्रक्रियेत चारही ...

Mahilaraj in Bhokardan Municipality | भोकरदन पालिकेत महिलाराज

भोकरदन पालिकेत महिलाराज

लोकमत न्युज नेटवर्क

भोकरदन : भोकरदन नगरपालिकेत शुक्रवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडप्रक्रियेत चारही सभापतीपदी महिलांना संधी देण्यात आली असून, नगराध्यक्षाही महिलाच असल्याने पालिकेवर आता माहिलाराज आल्याचे चित्र आहे.

नगर पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी अंजली कानडे-पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी गयाबाई रमेश जाधव, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी शेख फौजिया बेगम रिजवानोद्दीन, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती म्हणून शेख इरफानोद्दीन सिद्दीकी, तर नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी संध्या सुरेश शर्मा व स्त्रिया आणि बालविकास समिती सभापती म्हणून भिसे निर्मला भीमराव यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष मंजूषा देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे गटनेते संतोष अन्नदाते, राष्ट्रवादीचे गटनेते नसीम पठाण, भाजपच्या गटनेत्या आशा माळी, नगरसेवक राहुलसिंग ठाकूर, दीपक बोर्डे, फरजानाबी शेख जफर, पूजा तळेकर, विजय इंगळे, सुरेश शर्मा, रमेश जाधव, योगेश शर्मा, योगेश पुरोहित आदींची उपस्थिती होती.

------------------------------------------

नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी

अंबड : नगर परिषदेच्या विषय समिती सदस्य व सभापती आणि स्थायी समिती सदस्य निवडणूकी साठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन भालचंद्र सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सभापती व सदस्यांचे निवड करण्यात आली.

नगराध्यक्षा संगीता कुचे सिद्ध सभापती स्थायी समिती ,केदार कुलकर्णी उपाध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती ,काकासाहेब कटारे सार्वजनिक बांधकाम समिती, अरुण उपाध्ये स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती , केसरबाई लांडे अर्थ व नियोजन व विकास समिती, शेख नजमाबी महिला व बालकल्याण सभापती याप्रमाणे निवड करण्यात आली.

फोटो

१ केदार कुलकर्णी

२ काकासाहेब कटरे

Web Title: Mahilaraj in Bhokardan Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.