माहेश्वरी संघटनेने जपली बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 01:22 AM2020-01-20T01:22:07+5:302020-01-20T01:22:40+5:30

जालना जिल्हा माहेश्वरी महिला संगठनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू आणि त्यांच्या सहकारी महिलांनी अहंकार देऊळगाव येथील गरजवंत महिलांना संक्रांतीचं वाण म्हणून साडी, चोळी, बांगडी अन्य साहित्याचे वाटप संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगीच्या दिवशी करण्यात आले.

Maheshwari Association committed to commitment | माहेश्वरी संघटनेने जपली बांधिलकी

माहेश्वरी संघटनेने जपली बांधिलकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सधन आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांची संक्रांत बऱ्यापैकी साजरी होत असते. मात्र ग्रामीण भागातील कष्टकरी आणि गरजवंत महिलांना इच्छा असूनही त्या मनासारखी संक्रांत साजरी करु शकत नाहीत, हीच बाब लक्षात घेऊन जालना जिल्हा माहेश्वरी महिला संगठनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू आणि त्यांच्या सहकारी महिलांनी अहंकार देऊळगाव येथील गरजवंत महिलांना संक्रांतीचं वाण म्हणून साडी, चोळी, बांगडी अन्य साहित्याचे वाटप संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगीच्या दिवशी करण्यात आले.
यावेळी जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, सचिव मिनाक्षी दाड, उपाध्यक्षा नूतन दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, सहकोषाध्यक्षा अनिता राठी, सहसंगठन मंत्री संगीता लाहोटी, तसेच चंद्रकला भक्कड, पद्मा लड्डा, शशिकला बागडी, तारा काबरा, शोभा बांगड, विमला बांगड, शकुंतला मंत्री, रेखा सोनी, सुनिता मंत्री आदींची उपस्थिती होती. हा उपक्रम दरवर्षी राबविणार असल्याचे निर्मला साबू यांनी सांगितले.
उपक्रमासाठी सरपंच बाबासाहेब सोमधने, नारायण वाढेकर, माळाच्या गणपती संस्थानचे पुजारी विनायक महाराज यांनी सहकार्य केले. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Maheshwari Association committed to commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.