शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा जोतिबा फुलेंनी जात, धर्म बदलण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.महात्मा फुले प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले विचार, समाजसुधारणा व प्रासंगिकता याविषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, कुटुंबासह सामाजिक प्रश्न मांडत असतांना तुमचं शोषण कसं चालू आहे हे जोतिबांनी दाखवून दिलं. स्त्री-पुरुष दोघांना समान मानणाऱ्या फुलेंनी वयाच्या विसाव्या वर्षी दलित, अस्पृश्य स्त्रियांसाठी शाळा काढली. वाचनालय सुरु केली. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहही सुरु केले.सावित्रीबाई फुले यांनी समाज बदलण्याचे काम केले. त्यांनी दुष्काळात हजारों भाकरी थापून गोरगरीबांना जेऊ घातले. दुष्काळाच्या काळात सावित्रीबाईंनी पुण्याच्या कमिशनरची भेट घेऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्न सोडविला, असल्याचेही त्यांनी सांगितले.ही परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. स्मिता अवचार, संयोजन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. बंडू कावळे, डॉ. पुरुषोत्तम मनगटे, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. गांधी बानायत यासह परिषदेत महाराष्ट्रातील विविध अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. सूत्रसंचालन डॉ. आसाराम बेवले यांनी तर डॉ. गोवर्धन मुळक यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकSC STअनुसूचित जाती जमातीEducationशिक्षण