शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल स्कोअरबोर्डसह चार आखाड्यावर होणारी पहिलीच महाराष्ट्र केसरी : बाळासाहेब लांडगे 

By जयंत कुलकर्णी | Updated: December 20, 2018 16:58 IST

मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे

ठळक मुद्दे यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केले जाण्याची पहिलीच वेळ पदकविजेत्या व दिग्गज पहिलवानांसाठी शासनाच्या मदतीने पेन्शन योजना

- जयंत कुलकर्णी

जालना : येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असून मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद जालन्याला देण्यापाठीमागचा उद्देश त्यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘राज्य व राष्ट्रीय पातळीवर मल्ल घडावे, कुस्तीचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रत्येक वर्षी विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते. या वेळी दयानंद भक्त यांच्या मागणीमुळे जालना येथे ही स्पर्धा देण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुनराव खोतकर व दयानंद भक्त यांनी या स्पर्धेसाठी चांगले नियोजन केले आहे.’’

प्रथमच चार आखड्यावर महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चार आखाड्यावर होण्याची ही मराठवाड्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी वेळ आहे. या आधी पुणे जिल्ह्यातील भूगाव येथे चार आखाड्यावर ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपणही यू ट्यूबवर केले जाण्याचीदेखील पहिलीच वेळ आहे, अशी माहितीही बाळासाहेब लांडगे यांनी दिली. 

मल्लांना आर्थिक मदतमहाराष्ट्रातील पदकविजेत्या व दिग्गज पहिलवानांसाठी शासनाच्या मदतीने पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता राहुल आवारे याची आॅलिम्पिकच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. त्याच्यासह दहा पहिलवानांना राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आर्थिक साह्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

बदनाम करण्याचा कटराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान काही मल्लांना रेल्वेच्या शौचलयाजवळ बसून प्रवास करावा लागला होता व त्यांची गैरसोय झाली होती. याविषयी बाळासाहेब लांडगे म्हणाले, '' आम्हाला भारतीय कुस्ती महासंघाचे पत्र उशीरा आले. तरीही तात्काळ मल्लांच्या तिकिटांचे रिझर्व्हेशन करण्यात आले होते. रेल्वेवर काही कोणाची मक्तेदारी नाही. काही जणांची तिकिट कन्फर्म झाले नाही आणि या मोजक्याच जणांनी बदनाम करण्याचा हा कट रचला होता. आता आम्ही कुस्ती महासंघाला स्पर्धेविषयीचे सर्क्युलर दोन महिने आधी पाठवण्याची विनंती केली आहे जेणे करुन पहिलवानांचे स्पर्धेसाठी रिझर्व्हेशन करणे सोपे होईल.’’ 

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्रJalanaजालनाMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा