शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात महायुती-आघाडीत थेट लढती होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:54 IST

जालन्यात गोरंट्याल-खोतकर लढतीकडे लक्ष

ठळक मुद्देप्रमुख पक्षाच्या विरोधात अर्ज नाही

- संजय देशमुख 

जालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत यावेळी भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट सरळ लढती होतील, असे सध्याचे चित्र आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे एकत्रित लढले होते. त्यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममची युती तुटल्याचा नेमका लाभ कोणाला मिळतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरूध्द काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात परंपरागत लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना-भाजपची युती तुटल्याने भाजप स्वतंत्र लढले होते. त्यात बसपाकडून अब्दुल रशीद पहेलवान यांनी जवळपास ३७ हजार मते मिळवली होती. त्याचा मोठा फटका गोरंट्याल यांना बसला होता. यंदा शिवसेना -भाजपची युती आहे.

जालना शहरातील मतदारांवरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील.  गोरंट्याल यांच्या ताब्यात जालना पालिकेची सूत्रे असल्याने त्यांना जालन्यातून मोठी आशा आहे. जालन्यातून एमआयएमने माजी नगराध्यक्ष इक्बाल पाशा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांवरच गोरंट्याल यांचे भवितव्य अवंलबून राहील. घनसावंगी मतदारसंघात गेल्यावेळी तेथे शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण, भाजपकडून माजी आ. विलास खरात  आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राजेश टोपे यांच्यात लढत होती. ती यंदा उढाण आणि टोपे यांच्यात होणार आहे. वंचित आघाडीचे उमेदवार शेळके हे आहेत.

परतूर मतदारसंघातही परंपरागत लढत अपेक्षित असून, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरूध्द काँग्रेसचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्यात चुरस आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आ. संतोष दानवे यांच्याविरूध्द या मतदारसंघाचे राष्ट्रवादीकडून तीनवेळा नेतृत्व केलेले माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात सामना होणार आहे.  

प्रमुख पक्षाच्या विरोधात अर्ज नाहीजालन्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुठल्याच बड्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी जाहीर झालेल्या उमेदवाराविरूध्द उमेदवारी दाखल केलेली नाही. बदनापूर मतदारसंघातून सेनेचे माजी आ. संतोष सांबेर हे उमेदवारी अर्ज भरणार होते; परंतु नंतर मातोश्रीवरून त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाpartur-acपितूरghansawangi-acघनसावंगीbadnapur-acबदनापूरbhokardan-acभोकरदन