शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Maharashtra Election 2019 : जालन्यात आघाडी- युतीत सरळ लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 17:58 IST

पाचही  मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना-भाजप महायुतीमध्ये थेट लढत

ठळक मुद्देलोणीकर-जेथलिया यांची परतूरमध्ये लढतघनसावंगीत उढाण, टोपे यांच्यात सामना

- संजय देशमुख 

जालना :  जिल्ह्यातील पाचही  मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना-भाजप महायुतीमध्ये थेट लढतीचे चित्र  स्पष्ट  आहे. बदनापूर मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज परत घेतल्याने  जिल्ह्यात प्रमुख पक्षांविरुद्ध बंडखोरीचा झेंडा राहिला नाही.

जालना  मतदारसंघात ५६ अर्ज दाखल झाले होते.  त्यापैकी २४ जणांनी माघार घेतली तर ३२ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. परतूर मतदारसंघात २१ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७ जणांनी माघार घेतली असून, ३२ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. घनसावंगी मतदारसंघात २७ अर्ज आले होते. पैकी १४ जणांनी माघार घेतली असून, १३ उमेदवार रिंंगणात राहिले आहेत. भोकरदन मतदारसंघात ९ अर्ज दाखल झाले होते. पैकी ३ जणांनी माघार घेतली असून, ६ उमेदवार निवडणूक रिंंगणात राहिले आहेत. बदनापूरमध्ये २० अर्ज दाखल झाले होते. तर ६ जणांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार निवडणूक रिंंगणात उतरले आहेत. 

बदनापूरमध्ये भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांच्या विरोधात शिवसेनेचे जालन्यातील नगरसेवक बाबू पवार आणि शिवसेना दलित आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु,  या दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली. जालना मतदारसंघात आता पुन्हा परंपरागत लढत होणार आहे. त्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यात सरळ लढत होईल. येथे एमआयएमचे माजी नगराध्यक्ष इकबाल पाशा रिंंगणात असून, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. अशोक खरात हेही नशीब अजमावत आहेत. ते मतदारांवर किती प्रभाव पाडतात, हे आगामी काळात दिसून येईल. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती होती, ती आता नाही.

भोकरदन मतदारसंघात भाजपचे संतोष दानवे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोराडे निवडणूक लढवीत आहेत. बदनापूर मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे यांच्याविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांच्यात सामना होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे राजन मगरे हे निवडणूक लढवीत आहेत.

लोणीकर-जेथलिया यांची परतूरमध्ये लढतपरतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यात थेट लढत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी सवने हे रिंंगणात आहेत. 

घनसावंगीत उढाण, टोपे यांच्यात सामनाघनसावंगीत शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांच्यात सरळ सामना होईल. येथे वंचित बहुजन आघाडीचे विष्णू शेळके हे आखाड्यात आहेत. 

मनसेचे दोघे रिंगणातजिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बदनापूरमधून राजेंद्र भोसले तर परतूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळुंके हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019JalanaजालनाBJPभाजपाcongressकाँग्रेसjalna-acजालनाpartur-acपरतूरghansawangi-acघनसावंगीbhokardan-acभोकरदन