शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:09 IST

एकतर्फी लढत चुरशीची होणार 

ठळक मुद्दे१४ उमेदवार मैदानात 

- दिलीप सारडा

बदनापूर विधानसभा मतदारसंघात युती व आघाडीच्यावतीने जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची होणार असल्यामुळे यावेळेस बदनापूरचा गड कोण जिंकतो ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

गत निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. त्यामुळे मतदारसंघाचे चित्र वेगळे होते. यावेळी युती व आघाडी झाली आहे. यामुळे यावेळची परिस्थिती बदली आहे. त्यातच मतदारसंघात वंचित, अपक्ष व मनसेने आपले उमेदवार उभा केल्याने युती व आघाडीच्या संकटात भर पडली आहे.  हे उमेदवारही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी प्रचाराचा जोर वाढवित आहेत़ 

या निवडणुकीत आ. नारायण कुचे (भाजपा), बबलू चौधरी (राष्ट्रवादी), राजन मगरे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र भोसले (मनसे) यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवारआ. नारायण कुचे हे आपल्या काळातील विकास कामांच्या जोरावर मते मागत असून, याच मतदारसंघातून दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढलेले आघाडीचे बबलू चौधरी पुन्हा संधी देण्याची विनंती मतदारराजाकडे करीत आहेत. 

दुसरीकडे वंचितचे राजेंद्र मगरे, मनसेचे राजेंद्र भोसले, अपक्ष डॉ. अश्विनी गायकवाड यांनी सुध्दा मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिल्यामुळे सुरूवातीला सोपी वाटणारी निवडणूक मतविभाजनाच्या आकडेवारीत फसली असल्याने या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.दरम्यान, या मतदारसंघात मुख्य लढत भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे व राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदनापूरचा गड रोखल्या जातो की, पुन्हा ताब्यात घेतला जातो हे गुपित येणाऱ्या काळात उलगडणार आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना नियोजनाभावी बंद पडल्या. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होत आहे. शेतीसाठी मुबलक सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे बागायती शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवचनेत सापडला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- बदनापूर शहरात कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे आजही महिन्याला पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते.- मतदारसंघात बेरोजगार व मजुरांना काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. या मतदारसंघात औद्योगिक वसाहत, मोठ-मोठे उद्योग उभारलेले नाही़ बेरोजगार तरूणांची संख्या जास्त. दर्जेदार सेवेअभावी शिक्षण, आरोग्याचे प्रश्न कायम. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरुवस्था.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची जमेची बाजूआ. नारायण कुचे (भाजप)- ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्कठेवल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी. - सत्ताधारी असल्यामुळे ग्रामीण, शहरी भागात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास कामे केली.- ग्रामपंचायतींवर भाजपचा ताबा

बबलु चौधरी (राष्ट्रवादी)- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क. - राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात.- राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेली विकास कामे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहे.

राजेंद्र मगरे  (वंचित)- सरपंच म्हणून बदनापूरात केलेली विकास कामे. शहरातील प्रश्नांची माहिती व मोठा जनसंपर्क.- मतदारसंघात ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग.- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क.

राजेंद्र भोसले (मनसे)- शिवसेनेत काम केल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व जनतेशी संपर्क़- अंबड येथील असल्यामुळे तालुक्यातील मतांचा फायदा. - राज ठाकरे यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात.- गावागावात मनसेचे कार्यकर्ते.

2०14चे चित्रनारायण कुचे (विजयी, भाजप)बबलु चौधरी (पराभूत, राष्ट्रवादी काँग्रेस ) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalanaजालनाbadnapur-acबदनापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा