शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 17:32 IST

आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.

जालना-  आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी महादेव जानकर यांनी व्यासपीठावरुन मंत्री छगन भुजबळ यांना एक विनंती केली, या विनंतीनंतर समोर बसलेल्या गर्दींने घोषणा सुरू केल्या. 

जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

आमदार महादेव जानकर म्हणाले, 'ओबीसी का राज करेगा, देशपर राज आयेगा', जोपर्यंत ओबीसीचा स्वत:चा पक्ष होत नाही. तोपर्यंत अर्थ राहणार नाही. काँग्रेसचा आणि भाजपचे लोक येतील आणि तुम्हाला लुटून घेऊन जातील, भुजबळ साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, वेगळा पक्ष काढा. स्वत:च्या पक्षात उभं राहा, अशी विनंती जानकर यांनी केली. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी एकच घोषणाबाजी सुरू केली.  

'हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो'

मंत्री भुजबळ म्हणाले, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोला भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असंही भुजबळ म्हणाले. 

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांचा लाठिचार्ज सगळ्यांनी पाहिला आहे. सत्तर महिला पोलिसांसहीत दगडांचा मार खाऊन रुग्णालयात दाखल झाले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विनंती केली. पण, यांनी अगोदरच तयारी केली होती. त्या पोलिसांना त्यांनी अचानक दगडांचा मारा केला. पोलिस काय पाय घसरुन पडले का? असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरChhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण