लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:25 IST2019-06-27T00:25:12+5:302019-06-27T00:25:27+5:30
भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील भाविकांची पायी दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाली

लोणगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील भाविकांची पायी दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. पायी वारकऱ्यांचे गावातून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. गेल्या चार वर्षापासून दिंडीला सुरूवात करण्यात आली आहे.
लोणगाव येथील माजी सरपंच सरस्वतीबाई आप्पासाहेब साखरे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी गावातून दिंडीला सुरूवात केली असून पंढरीला जात आहे. दिंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिंडीत लोणगाव, ऊंबरखेडा, पोखरी, डोणगाव आदी गावांतील भाविकांचा समावेश आहे. दिंडीत सहभागी होणाºया भाविकांचे धार्मिक, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, सामाजिक सलोखा, देशभक्ती यावर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जात असल्याचे आप्पासाहेब साखरे यांनी सांगितले.