जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:15+5:302021-01-23T04:32:15+5:30

जालना : बदनापूर शहरातील चर्च परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून तिघांना ताब्यात ...

Local Crime Branch raids gambling dens | जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

जालना : बदनापूर शहरातील चर्च परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. संदेश निल्सन कांबळे, अजय विजय श्रीसुंदर (दोघेही रा. चर्चसमोर, ख्रिश्चन मोहल्ला, बदनापूर), प्रभाकर मुरलीधर तुपे (रा. केळीगव्हाण, रा. बदनापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

बदनापूर शहरातील चर्च परिसरात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सदरील ठिकठिकाणी छापा टाकला असता, खुर्च्या टेबल लावून काहीजण कल्याण ओपन व मिलन डे नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संदेश कांबळे, अजय श्रीसुंदर व प्रभाकर तुपे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह रोख रक्कम असा २७ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाज भुंजग, सपोनि. शिवाजी नागवे, पोहेकॉ. हरीष राठोड, फुलचंद हजारे, अमलदार किशोर जाधव आदींनी केली.

Web Title: Local Crime Branch raids gambling dens