शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:54 IST

दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, तलाव, विहिरी कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके जगली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीच केली नव्हती.घनसांवगी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ११ हजार ७७ हेक्टर एवढे आहे. यातील ९९ हजार ४१५ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. तर उवर्रित क्षेत्र पडीत आहे. तालुक्यातील घनसांवगी, पिंपळगाव, तीर्थपुरी, राणीउंचेगाव, आंतरवाली टेंभी व जांबसमर्थ या सात महसूल मंडळात ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ४९ हजार २१३ हेक्टरवर कापूस, १ हजार ३७० हेक्टरवर बाजरी, १३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ५०१ हेक्टरवर मूग, ४८८ हेक्टरवर मका, ५४ हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे.दरम्यान, या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी खत व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, तलाव, विहिरी व कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात उन्हाळ्यात १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील तलाव कोरडेठाक आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात