राहतात जालन्यात; लायसन्स काढले परदेशाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:07+5:302021-07-11T04:21:07+5:30

जालना : जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील अकरा वर्षांत तब्बल ७९ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे ...

Live in burning; License removed from abroad! | राहतात जालन्यात; लायसन्स काढले परदेशाचे!

राहतात जालन्यात; लायसन्स काढले परदेशाचे!

जालना : जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील अकरा वर्षांत तब्बल ७९ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे या व्यक्तींना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. असे असले तरी सर्व व्यक्ती जालन्यातच राहतात.

शिक्षण आणि नोकरीसाठी अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती या आंतरराष्ट्रीय लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे रितसर अर्ज सादर करतात. त्यानुसार विदेशात जाणाऱ्यांना व रितसर ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात जालना, भोकरदन, जाफराबाद, अंबड, मंठा, बदनापूर, परतूर, घनसावंगी या आठ तालुक्यांचा समावेश आहे. मागील अकरा वर्षांत येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल ७९ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. यात सर्वाधिक २०१८ मध्ये देण्यात आले आहे. यावर्षी १८ जणांना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पर्यटन, नोकरी, व्यवसायासाठी परदेशात जाणारे नागरिक विदेशी वाहन परवाना काढून घेतात. २०११ पासून आजपर्यंत ७९ जणांना परवाना देण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षांपासून संख्या कमी झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केल्यास २४ तासांत संबंधित व्यक्तींना परवाना दिला जातो. परवान्यासाठी आलेल्या व्यक्तीची प्रत्यक्ष चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली जाते, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

तुम्हालाही काढायचेय का लायसन्स?

जर तुम्हालाही परदेशात वाहन चालविण्या्साठी लायसन्स काढायचे असेल, तर पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र, व्हिजा, ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रे घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमक्ष तुमची स्वाक्षरी घेतली जाईल. नोकरी, शिक्षण, व्यवसाय कशासाठी जायचे आहे, याची प्राथमिक चौकशी केली जाते.

अर्ज केल्यावर २४ तासांत परवाना दिला जातो. वाहन चालविण्यासाठी आपण काढलेला परवाना सोबत जोडून संबंधित कागदपत्रे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केल्यावर परदेशात चालणारे लायसन्स दिले जाते.

मुदत एक वर्षाचीच

रितसर अर्ज सादर करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणाऱ्यांची प्रकरणे लवकर निकाली काढली जात असून, या लायसन्सचा कालावधी एक वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हे लायसन्स रिनिव्हल करता येते.

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पूर्वी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जायचे;पण आता शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. परदेशातून परत आल्यावर लायसन्स पडताळणी करून घ्यावे लागते. वर्षभरानंतर या लायसन्सची मुदत संपते, असे सांगण्यात आले.

Web Title: Live in burning; License removed from abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.