लायन्सच्या उपक्रमामुळे दृष्टिहिनाला मिळाली दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:20+5:302021-01-08T05:39:20+5:30
परतूर लायन्स क्लबच्या माध्यमातून आजवर असंख्य रुग्णांची नेत्रतपासणी व नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. असेच निराधार व दोन्ही डोळ्यांची दृष्टी ...

लायन्सच्या उपक्रमामुळे दृष्टिहिनाला मिळाली दृष्टी
परतूर लायन्स क्लबच्या माध्यमातून आजवर असंख्य रुग्णांची नेत्रतपासणी व नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. असेच निराधार व दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या पांगरी गोसावी (ता. मंठा) येथील भालचंद्र राठोड यांना दृष्टी देण्याचे काम लायन्स क्लबने केले आहे. राठोड यांची दृष्टी गेल्याने कोणाचा तरी आधार घेऊन त्यांना चालावे लागायचे. त्यांचा एक डोळा निकामी झाला होता, तर एका डोळ्यात मोतीबिंदू शेवटच्या टप्प्यात गेलेला होता. १ जानेवारी रोजी शुक्रवारी राठोड यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. शनिवारी २ जानेवारी रोजी राठोड यांच्या डोळ्यावरील पट्टी काढल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्वीसारखे दिसू लागले. या शस्त्रक्रियेमुळे पुन्हा दृष्टी मिळाल्यामुळे राठोड यांनी समाधान व्यक्त केले.
अखंड सेवा सुरू राहणार
आमच्या क्लबची समाजोपयोगी सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे. राठोड यांना कोणाचा अधार नव्हता. त्यात दृष्टीही गेली होती. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. शस्त्रक्रियेनंतर राठोड यांना पूर्ववत जग पाहता येत आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समाधान आहे.
मनोहर खालापुरे, लायन्स क्लब