लायन्स क्लबची इंटरनॅशनल ‘आलेख परिषद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:11 IST2017-12-29T00:11:27+5:302017-12-29T00:11:42+5:30
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे.

लायन्स क्लबची इंटरनॅशनल ‘आलेख परिषद’
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे. या विभागीय परिषदेस इंटरनॅशनल डायरेक्टर ला. एन्डोर्सी नवल मालू, ला. प्रांतपाल संदीप मालू, प्रथम उपप्रांतपाल ला. संजय व्होरा व द्वितीय उपप्रांतपाल ला. नितीन बंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लायन्सच्या विभाग चारमध्ये जवळपास १९ क्लब असून, सुमारे सातशे सदस्यसंख्या आहे. पैकी बहुतांश सदस्य या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरपर्सन एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरिया यांनी दिली. परिषदेत क्लबमार्फत घेतल्या गेलेल्या समाजसेवी प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनी त्यांच्या काळात समाज उपयोगी प्रकल्प राबवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लायन्स क्लब जालनाचे चार्टर मेंबर सुरेश अग्रवाल, परभणी लायन्स क्लबचे चार्टर मेंबर पूनमचंद मुथा, अमित खालापुरे यांनी आजपर्यंत लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी जे योगदान दिले, त्यासाठी त्यांचा विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विविध वैयक्तिक बक्षिसे, क्लबसाठी विविध बक्षिसे, विभागातील १९ क्लबच्या अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्षांसाठी स्पर्धा, लायन्स सदस्यांसाठी ५१ लकी ड्रॉची बक्षिसे या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. ही परिषद यशस्वी करण्यासाठी परिषदेचे संयोजक कमलबाबू झुनझुनवाला, गोवर्धन अग्रवाल व विजय दाड व इतर परिषदेच्या कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
रुग्णवाहिकेचे होणार लोकार्पण
जालना लायन्स परिवारातील परतूर क्लबचे सदस्य मनोहरराव खालापुरे व त्यांच्या चमूने वर्षभरात जवळपास ४०० गरीब रुग्णांवर नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया औरंगाबादेत लायन्स हॉस्पिटल येथे केल्या. लायन्स क्लबने प्रवास व राहण्याचा खर्चही उचलला. गरीब रुग्णांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन लायन्स परिवारातील काही सदस्यांनी ९ लक्ष रुपयांचा निधी जमा करुन एक रुग्णवाहिका विकत घेतली. त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा या परिषदेच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.