ट्रान्सफॉर्मरला चिकटून लाईनमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:54 IST2017-12-19T00:53:14+5:302017-12-19T00:54:04+5:30

दुरुस्ती कामासाठी ट्रान्सफॉर्मरवर चढलेल्या लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील खडकावाडी येथे सोमवारी दुपारी घडली.

Lineman dead due to shock of transformer | ट्रान्सफॉर्मरला चिकटून लाईनमनचा मृत्यू

ट्रान्सफॉर्मरला चिकटून लाईनमनचा मृत्यू

जालना / घनसावंगी : दुरुस्ती कामासाठी ट्रान्सफॉर्मरवर चढलेल्या लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील खडकावाडी येथे सोमवारी दुपारी घडली. भगवान दगडू पवार (५६, रा. मच्छिंद्र
चिंचोली) असे मृत लाईनमनचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी पवार दुपारी वर चढले. मात्र विजेच्या जबर धक्क्यामुळे ते जागीच मृत्यूमुखी पडले.
मृतदेह तासभर तसाच पडून होता. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर विद्युत विभाग कर्मचारी व पोलिसांनी विद्युत प्रवाह खंडित करून मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणी डॉ. गणेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Lineman dead due to shock of transformer