जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दहा पेक्षाही कमी कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:59+5:302021-01-14T04:25:59+5:30
जालना : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. विशेषत: जिल्ह्यातील आठपैकी पाच ...

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दहा पेक्षाही कमी कोरोना बाधित रुग्ण
जालना : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. विशेषत: जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांमध्ये दहापेक्षाही कमी बाधित रुग्ण असून, नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे तंताेतंत पालन केले तर हे तालुके कोरोनामुक्त राहण्यास मदत होणार आहे.
जालना जिल्ह्यात आजवर १३ हजार ४०७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजार ८८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर अंबड तालुक्यात १५६०, बदनापूर ७३८, भोकरदन ७५७, घनसावंगी १३८३, जाफराबाद ५९५, जालना ६०८९, मंठा ५८८, तर परतूर तालुक्यात ५८९ रुग्ण आढळून आले आहेत. इतर जिल्ह्यातील ११०८ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १२ हजार ८८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेषत: जालना तालुक्यात सर्वाधिक ११३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर अंबड तालुक्यात १२ व परतूर तालुक्यात १० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. इतर पाच तालुक्यात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत.
कोरोनामुळे जालना तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
कोरोनामुळे आजवर ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १७९ जणांचा, तर सर्वात कमी मंठात तालुक्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अंबड तालुक्यात ३६, बदनापूर ११, भोकरदन १५, घनसावंगी १८, जाफराबाद १६, परतूर १३, इतर जिल्ह्यातील ५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुका ॲक्टिव्ह रुग्ण
अंबड १२
बदनापूर ०६
भोकरदन ०२
घनसावंगी ०२
जाफराबाद ०५
जालना ११३
मंठा ०७
परतूर १०
इतर जिल्हा ०९