बिबट्याचा हल्ला, एक पिल्लाचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:08 IST2019-03-07T01:07:51+5:302019-03-07T01:08:05+5:30
शेतातील गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पिल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना अंबड तालुक्यातील भारडी शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

बिबट्याचा हल्ला, एक पिल्लाचा पाडला फडशा
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : शेतातील गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पिल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना अंबड तालुक्यातील भारडी शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली. जनावरावर हल्ला करण्याची या आठवड्यातील दुसरी घटना असल्याने परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.
परिसरात सिंचनाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने पाण्याच्या शोधात परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भारडी येथील शेतकरी नारायण देविदास दानशूर यांनी शेतातील गोठ्यात म्हशीचे पिल्लू बांधून घरी गेले होते. सकाळी शेतात आल्यानंतर वगारु गोठ्याबाहेर निपचित पडलेले आढळून आले. बिबट्याने हल्ला करुन या पिलाचा ठार केल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शेतकरी जगन्नाथ मारुती डोईफोडे यांच्या गट नं. २०२ मध्ये ४ फेब्रुवारी रोजी पहाटे या पिल्लावर हल्ला करून ठार केले होते. दोन दिवसात दोन पिल्ले ठार झाल्याने शेतवस्तीवर राहणा-या शेतक-यांत धास्ती पसरली आहे.