बिबट्याचा शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांत भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:57 IST2018-09-02T00:57:08+5:302018-09-02T00:57:43+5:30
अंबड तालुक्यातील कृष्णानगर येथील शेतीवस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

बिबट्याचा शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांत भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील कृष्णानगर येथील शेतीवस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
शेतकरी बबन रामभाऊ सकुंडे यांच्या राहत्या घरा समोर बांधलेल्या शेळ्यांपैकी एका शेळीवर शुक्रवारी रात्री १० वाजता अचानक हल्ला केला. शेळीच्या मानेला धरून घरा जवळील ऊसाच्या शेतामध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू बबन सकुंडे यांना शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे ते जागे झाले असता त्यांना लाईटच्या उजेडामुळे त्यांची नजर बिबट्यावर पडली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेळीला सोडुन बिबट्या जवळील ऊसाच्या शेतामध्ये पळुन गेला. बिबट्याचे दात शेळीच्या मानेवर खोलवर रुतल्याने शेळीचा मृत्यू झाला. सकुंडे यांनी रात्री अकरा वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांना फोन करून कल्पना दिली सकाळी वनविभागानच्या
/>सारिका पाखरे , वनरक्षक एस . डी . तागडे व वनमजुर यांनी पंचनामा करुन जागेची पाहणी केली. बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना बघता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी वनविभागाने निवेदनाव्दारे केली. निवेदनावर सतिश तारख, गणेश तारख, सचिन सकुंडे, एकनाथ गाडे, प्रविण तारख आदींनी केली.