एलईडी लाइट चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:30+5:302021-02-24T04:32:30+5:30
चंदनझिरा पोलिसांची कारवाई ; २२८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना : जालना शहरातील सारस्वतनगर येथून ६ एलईडी लाईट चोरून नेणाऱ्यास ...

एलईडी लाइट चोरणारा अटकेत
चंदनझिरा पोलिसांची कारवाई ; २२८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना : जालना शहरातील सारस्वतनगर येथून ६ एलईडी लाईट चोरून नेणाऱ्यास चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. रवि शिवाजी पवार (२५ रा. मोतीबाग) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २२ हजार ८०० रुपयांचे एलईडी लाईट जप्त करण्यात आले.
सारस्वतनगर येथील रमेश भुमैया चौकी यांनी लग्नकार्यासाठी लावलेले ६ एलईडी लाईट चोरून नेल्याची तक्रार १७ फेब्रुवारी रोजी दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी अनिल काळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदरील गुन्हा मोतीबाग येथील एका व्यक्तीने केला आहे. या माहितीवर पोलिसांनी रवी पवार यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एलईडी जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्यामसुंदर कौठाळे, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोलीस नाईक नंदलाल ठाकूर, कर्मचारी विजय साळवे, चंद्रकात माळी, अनिल काळे करीत आहेत.