मंठ्यातील लेदर क्लस्टर ऑक्सिजनवर : बाराशे जणांचा रोजगार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:51+5:302021-06-09T04:37:51+5:30

यातून सुरू झालेल्या क्लस्टरसाठी मंठ्यात एक हेक्टर जागा घेऊन तेथे अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून चप्पल, बूट, तसेच स्पोर्टचे बूट, पर्स, ...

Leather cluster in Mantha on Oxygen: Employment crisis of twelve hundred people | मंठ्यातील लेदर क्लस्टर ऑक्सिजनवर : बाराशे जणांचा रोजगार संकटात

मंठ्यातील लेदर क्लस्टर ऑक्सिजनवर : बाराशे जणांचा रोजगार संकटात

यातून सुरू झालेल्या क्लस्टरसाठी मंठ्यात एक हेक्टर जागा घेऊन तेथे अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून चप्पल, बूट, तसेच स्पोर्टचे बूट, पर्स, बॅग आदींचे उत्पादन केले जात होते. हे उत्पादन जेएलसी या ब्रँडने त्यांची विक्री होते. यासाठी लागणारा कच्चा माल हा चेन्नई, आग्रा येथून आणला जातो, तसेच या ब्रँडचे मार्केटिंग करण्यासाठी मंत्रालय पातळीवरील मैत्री या सेलकडून मदत केली जाते. त्यामुळे ती संपूर्ण राज्यभर पोहोचली आहे. कोल्हापुरी चप्पलचेही येथे उत्पादन केले जात असल्याचे दत्ता वाघमारे यांनी सांगितले. हे क्लस्टर उभारणीसाठी केंद्र, तसेच राज्य सरकारच्या उद्योग विभागाने मोठी मदत केली. ज्येष्ठ सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे, माजी उद्योग सचिव गवई, तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रकल्पास भेट देऊन प्रेरणा दिली.

कोरोनाने आर्थिक संंकट झाले गडद

कोरोनाच्या कहराने आमच्या जोशाबा या क्लस्टरचा गाडा आर्थिक संकटात सापडला आहे. आता नव्याने भरारी घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत असून, शासनाकडून दोन कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे तसा प्रस्ताव दाखल केला आहे. तो मंजूर झाल्यास या क्लस्टरला नव्याने संजीवनी मिळेल.

दत्ता वाघमारे, सचिव जोशाबा क्लस्टर, मंठा

Web Title: Leather cluster in Mantha on Oxygen: Employment crisis of twelve hundred people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.