रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:53+5:302021-01-19T04:32:53+5:30
यावेळी परिवहन महामंडळाचे विभागप्रमुख नेहुल, यंत्र अभियंता डी. लांडगे, मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, नितीन पाटील, सहाय्यक ...

रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
यावेळी परिवहन महामंडळाचे विभागप्रमुख नेहुल, यंत्र अभियंता डी. लांडगे, मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, नितीन पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राधा सोळुंके, राजकुमार मुंढे, अभिजित रिळे, चेत्राली इंगळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रस्त्यावर वाहन चालवताना चालकांनी योग्य खबरदारी घ्यावी. जेणेकरून अपघात होणार नाहीत. तसेच वाहन चालवताना विनापरवाना वाहन चालवू नये. अपघात घडल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याबाबत काळे यांनी मार्गदर्शन केले. नेहुल म्हणाले की, मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अपघाताची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहन चालविताना मद्यप्राशण करू नये, असे आवाहन केले. यावेळी लांडगे, मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, सहायक मोटर वाहन निरीक्षक राजकुमार मुंढे, सहायक मोटार वाहन निरीक्षक राधा सोळुंके, आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक अभिजित रिळे यांनी, तर आभार मोटार वाहन निरीक्षक नितीन पाटील यांनी मानले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक उदय साळुंखे, पठाण, नितीन एस. पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक अमोल राठोड, कृष्णा मोहकरे, प्रियंका छडीदार, अश्विनी जोगदंड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.