शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोणगाव येथे माझं गाव-सुंदर गाव अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथे माझं गाव सुंदर गाव अभियानास शुक्रवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. यावेळी गाव ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथे माझं गाव सुंदर गाव अभियानास शुक्रवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. यावेळी गाव परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.

२२ जानेवारी ते २२ मार्चपर्यंत माझं गाव सुंदर गाव अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावातील केरकचऱ्याची विल्हेवाट लावणे, शासकीय कार्यालयाचे सुशोभीकरण, प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी, वन्य प्राण्यासाठी पाणवठे तयार करणे, गावांत कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम राबवणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी गजानन लहाने, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब साखरे, ओंकारसिंह शेखावत, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास अधिकारी जे.एम. खैरे यांनी गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत केरकचरा साफ केला जाणार असून, गावातील शासकीय कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात येऊन मोहीम यशस्वी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो

लोणगाव येथे माझं गाव सुंदर गाव अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना विस्तार अधिकारी गजानन लहाने, ग्रामविकास अधिकारी जे.एम. खैरे आदी.