नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:25 IST2018-03-11T00:24:51+5:302018-03-11T00:25:10+5:30
महिलांचे आकर्षण असणारे लोकमत सखीमंच सदस्यता नोंदणीसाठी खास गृहिणींच्या आग्रहास्तव दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. जालना शहरातील महिलांसाठी नवकार ज्वेलर्सच्यावतीने सोमवारपर्यंत सदस्य नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिलांचे आकर्षण असणारे लोकमत सखीमंच सदस्यता नोंदणीसाठी खास गृहिणींच्या आग्रहास्तव दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. जालना शहरातील महिलांसाठी नवकार ज्वेलर्सच्यावतीने सोमवारपर्यंत सदस्य नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांसह पाककला व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी सखी मंचच्या माध्यमातून महिलांना मिळते. सखी मंच सदस्यत्व नोंदणी करताच सखींना ७७५ रुपये किमतीची अंजली किचन कॉम्बो सेट यासह जागर स्त्रीशक्तीचा पुस्तक आणि सखीमंच ओळखपत्र मिळणार आहे. सदस्यांना सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास, सेलिब्रेटींच्या भेटी, सण-समारंभाची धमाल कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे. यासह राज्यस्तरीय भाग्यवंत सोडतमध्ये गोल्डन धमाकामध्ये लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.