घरफोडीत साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST2020-12-27T04:23:03+5:302020-12-27T04:23:03+5:30
परतूर (जालना) : चोरट्यांनी एका घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा पाच लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही ...

घरफोडीत साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
परतूर (जालना) : चोरट्यांनी एका घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा पाच लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना परतूर शहरातील जिजाऊनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली.
परतूर शहरातील जिजाऊनगर भागातील होलाणी यांच्या घरी वनक्षेत्रपाल मनीषा रामजी मदरगे या किरायाने राहतात. मदरगे या २५ डिसेंबर रोजी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून आतील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, गोफ, लॉकेट, बाळाचे दागिने व रोख ५९ हजार रुपये असा एकूण ५ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी दुसऱ्या घरी किरायाने राहणारे अग्रवाल यांनी मदरगे यांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडखे हे करीत आहेत.
डीवायएसपींनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सोपान बांगर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच उपस्थित पोउपनि सुनील बोडखे, हवालदार आण्णासाहेब लोखंडे, राजेश काळे यांना तपासाबाबत सूचना दिल्या.
कॅप्शन : ०१. परतूर येथील चोरी झालेल्या घरी तक्रारदारांशी चर्चा करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर. समवेत पोउपनि. सुनील बोडखे, हवालदार अण्णासाहेब लोखंडे, राजेश काळे आदी. (२६ जेएनपीएच ०२)
०२. परतूर येथील घटनास्थळाची पाहणी करताना परतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी. (२६ जेएनपीएच ०३)
===Photopath===
261220\26jan_2_26122020_15.jpg~261220\26jan_3_26122020_15.jpg
===Caption===
कॅप्शन : ०१. परतूर येथील चोरी झालेल्या घरी तक्रारदारांशी चर्चा करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर. समवेत पोउपनि. सुनील बोडखे, हवालदार अण्णासाहेब लोखंडे, राजेश काळे आदी. (२६ जेएनपीएच ०२)०२. परतूर येथील घटनास्थळाची पाहणी करताना परतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी. (२६ जेएनपीएच ०३)~कॅप्शन : ०१. परतूर येथील चोरी झालेल्या घरी तक्रारदारांशी चर्चा करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर. समवेत पोउपनि. सुनील बोडखे, हवालदार अण्णासाहेब लोखंडे, राजेश काळे आदी. (२६ जेएनपीएच ०२)०२. परतूर येथील घटनास्थळाची पाहणी करताना परतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी. (२६ जेएनपीएच ०३)