शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जालन्यात चोरीच्या वाहनांचे लाखों रुपयांचे सुट्टे भाग जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:45 IST

गोडाऊनचा मालक मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालना : शहरातील जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी झालेल्या २० चारचाकी वाहनांचे इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला आहे. गोडाऊनचा मालक मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राऊत नगर येथील एका गॅरेजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या गॅरेजमध्ये विविध कंपन्याच्या चारचाकी वाहनाचे १५ पंधरा इंजिन  तसेच चारचाकी वाहने खोलुन वाहनांचे खुले भाग आढळून आले. त्यानंतर मजहर नजीर खान याला आरटीओ परवानगी बाबत विचारणा केली असता, त्यांने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.  दरम्यान, शनिवारी या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या गॅरेजमध्ये १५ विविध कंपनीच्या चारचाकी वाहनाचे इंजिन, गेअर बॉक्स, इजिन हेड, सेल्फ स्टॉटर, रेडीअ‍ेटर, कंन्डेनसर यासह इतर विविध सुट्टे भाग असा एकूण ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी,  पोना सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सागर बासिस्कर, रंजित वैराळ, पोकॉ. सचिन चौधरी, विलास  चेके, परमेश्वर धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे आदींनी केली.

टॅग्स :raidधाडJalanaजालनाPoliceपोलिसfour wheelerफोर व्हीलर