शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलिका नदी स्वच्छता करणाऱ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : समस्त महाजन ट्रस्ट आणि रोटरी क्लबसह शहरातील ४५ स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसांपूर्वी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समस्त महाजन ट्रस्ट आणि रोटरी क्लबसह शहरातील ४५ स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसांपूर्वी जालन्यातून वाहणा-या कुंडलिका व सिना नदीपात्राच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सोमवारी देहडकरवाडी पुलाजवळ काही नागरिक नदीपात्रात कचरा टाकत होते. हा कचरा नदीत टाकू नका, असे आवाहन त्यांना केल्यावरही त्यांनी ते न मानता उलट स्वच्छता करणा-या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जालना शहरातील नद्यांची स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने समस्त महाजन ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी पुढाकार घेऊन हे अभियान सुरू केले आहे. मोठ्या धडाक्यात या अभियानाला प्रारंभ होऊन नदीपात्र स्वच्छतेला प्रतिसादही मिळत होता. दरम्यान, रामतीर्थ येथून सुरू झालेले हे स्वच्छता अभियान आता देहडकरवाडी पुलापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी जेसीबीद्वारे स्वच्छता मोहीम सुरू होती. याचवेळी एका रिक्षातून आलेल्या नागरिकांनी सोबत आणलेला कचरा नदीपात्रात टाकण्याचा प्रयत्न केला. हा कचरा येथे टाकू नये आम्ही येथे स्वच्छता अभियान राबवीत आहोत. त्यामुळे सहकार्य करावे, अशी विनंती कर्मचा-यांनी केली. परंतु, तुम्ही आम्हाला रोखणारे कोण ? असा सवाल करीत स्वच्छता कर्मचा-यांसह स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आलेल्या बाहेरगावच्या सदस्यांनाही जमावाने मारहाण केली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांना कळविण्यात आल्यावर त्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित मारहाण करणाºया अज्ञातांविरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी शहरातील स्वच्छता प्रेमी नागरिक सोमवारी सायंकाळी कुंडलिका नदीपात्रात एकत्रित आले होते. त्यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून पोलिसांनी मारहाण करणा-यांना अटक करावी, अशी मागणी केली. घटनेची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनाही देण्यात आली. त्यांनी देखील याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी शेख अन्सार याला कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.स्वच्छता मोहिमेला खीळ!कुंडलिका आणि सिना नदीतील स्वच्छता मोहिमेला या मारहाणीमुळे खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच जालन्यात सकारात्मक काम होत असताना असा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :riverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक