कुलकर्णी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST2021-02-18T04:55:58+5:302021-02-18T04:55:58+5:30
साहित्याचे वाटप घनसावंगी : तालुक्यातील चित्रवडगाव येथील अंगणवाडीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन सोसे, सुनील पोकळे, ...

कुलकर्णी यांचा सत्कार
साहित्याचे वाटप
घनसावंगी : तालुक्यातील चित्रवडगाव येथील अंगणवाडीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन सोसे, सुनील पोकळे, संतोष सोसे, गोंदालाल जावळे, अशोक ढोबळे, मदन सोसे आदींची उपस्थिती होती.
कारवाईची मागणी
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्रीला बंदी असताना राजरोस वाहतूक, विक्री होत आहे. त्यामुळे युवक व्यसनधीन होत आहेत. संबंधित विभागाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
विजेअभावी पिके धोक्यात
घनसावंगी : थकीत वीजबिलासाठी महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत. महावितरणने पूर्ववत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत
हसनाबाद : भाजपचे आ. संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे.