कु-र्हाडीने वार करून पत्नीस केले ठार...विष प्राशन करून पतीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:37+5:302021-03-31T04:30:37+5:30

मानदेऊळगाव - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस ठार केले, त्यानंतर विष प्राशन करून पतीने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील ...

Ku-rhadi attacked and killed his wife ... Husband also committed suicide by consuming poison | कु-र्हाडीने वार करून पत्नीस केले ठार...विष प्राशन करून पतीचीही आत्महत्या

कु-र्हाडीने वार करून पत्नीस केले ठार...विष प्राशन करून पतीचीही आत्महत्या

मानदेऊळगाव - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस ठार केले, त्यानंतर विष प्राशन करून पतीने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील वंजार उमरद येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मैनाबाई बाजीराव लहाने (४८) व बाजीराव दामाजी लहाने (५२) अशी मयतांची नावे आहेत.

मैनाबाई लहाने व बाजीराव लहाने हे दोघे मुलगा व सुनेसोबत वंजार उमरद येथील शेतात राहतात. बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुलगा हा किराणा सामान आणण्यासाठी गावात गेला होता. हीच संधी साधत बाजीराव लहाने यांनी मैनाबाई यांच्या मानेवर कु-र्हाडीने वार करून ठार केले. हे विदारक चित्र पाहताच सून बेशुध्द झाली. त्यानंतर विष प्राशन करून बाजीराव लहाने यांनी आत्महत्या केली. मुलगा आल्यावर त्याला रक्त भंबाळ अवस्थेत आई दिसली. तर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोनि. देविदास शेळके, सपोनि. संभाजी वडते यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यापुढील तपास सपोनि. संभाजी वडते हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा सैनिक आहे तर एक मुलगी ग्रामविकास अधिकारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुनेने दिली कबुली

बेशूध्द असलेल्या सुनेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी सुनेला विचारपूस केली असता, तिने बाजीराव लहाने यांनी मैनाबाई लहाने यांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला व त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Ku-rhadi attacked and killed his wife ... Husband also committed suicide by consuming poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.