शहागड येथे हरिनाम सप्ताहनिमित्त कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:07+5:302021-01-16T04:35:07+5:30

अंबड : तालुक्यातील कुक्कडगाव येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन ...

Kirtan on the occasion of Harinam Week at Shahagad | शहागड येथे हरिनाम सप्ताहनिमित्त कीर्तन

शहागड येथे हरिनाम सप्ताहनिमित्त कीर्तन

अंबड : तालुक्यातील कुक्कडगाव येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास किसनराव पटेकर, प्रकाश पटेकर, अनिल खरात, अण्णासाहेब पटेकर, विजय पटेकर, विशाल पटेकर, विनोद खरात, रतन पटेकर आदींची उपस्थिती होती.

सैनिकांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

जालना : १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले आणि जे हयात आहेत, अशा जिल्ह्यातील माजी सैनिकांना सेवानिवृत्ती वेतन आणि केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून मासिक, वार्षिक चरितार्थ मदत मिळत नाही, अशा माजी सैनिकांनी सक्रिय सहभागाबाबत पुराव्याची छायांकित प्रत घेऊन जिल्हा माजी सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

वाढत्या धुक्यामुळे कांदापीक धोक्यात

जालना : गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात धुके वाढले आहे. वाढत्या धुक्यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. कांद्याच्या पाती वाकड्या होत असून, काही ठिकाणी कांदा कोमेजून जात आहे. ही बाब पाहता, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कांदा उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Kirtan on the occasion of Harinam Week at Shahagad